कर्जत : बातमीदार
नेरळ- माथेरान टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्थेने माथेरान घाटातील वॉटरपाईप परिसरातील ओसाड जागेवर वृक्षलागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र कराळे यांच्या हस्ते करण्यात आला. नेरळ-माथेरान टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्था गेल्या दहा वर्षांपासून माथेरानच्या डोंगरात वृक्षलागवड करीत आहे. गेली दहावा वर्षे सातत्याने टॅक्सी संघटना वृक्ष लागवड कार्यक्रम करीत आहेत. नेरळ येथील हुतात्मा चौकापासून या संस्थेच्या सभासदांनी वृक्षलागवड करण्यास सुरुवात केली होती. आता घाटमार्गातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्याचे नियोजन संस्थेने केले आहे. या मोहिमेचा शुभारंभ वॉटरपाईप परिसरात संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र कारले यांच्या हस्ते करण्यात आला. राजू हजारे, सचिन लोभी, बाळा भागीत आदी पदाधिकार्यांसह सर्व सदस्य या वृक्षलागवड मोहिमेत सहभागी झाले होते.