Breaking News

गव्हाण विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त

गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छात्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये बुधवारी (दि. 25) सकाळी 10.30 वा. संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 132 वा जयंती सोहळा व ज. आ. भागत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर पुरस्कृत गुणवंत विद्यार्थी व अध्यापक पारितोषिक वितरण सोहळा संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

प्रारंभी विद्यार्थ्यांच्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तसेच अटल टिंकरिंग लॅबच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या व संशोधित केलेल्या उपक्रमांचे प्रदर्शन विभागप्रमुख रवींद्र भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली भरविण्यात आले. अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार जाधव यांनी कर्मवीरांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्राचार्या साधनाताई डोईफोडे यांनी प्रास्ताविक व अहवालवाचन केले. रेल्वे महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती ममता यांनीही विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. पूनम शिरसाट हिचे भाषण झाले.

या वेळी पनवेल पंचायत समितीच्या सदस्या रत्नप्रभा घरत, वसंत पाटील, गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत, उलवे ग्रामपंचायत सरपंच कविता खारकर, शरद खारकर, एम. डी. खारकर, रेल्वे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती ममता, स्थानिक शाळा समितीचे सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, कामिनी कोळी, इंदुताई घरत, माई भोईर, साईचरण म्हात्रे, काशिनाथ पाटील, उलवे शाखेचे मुख्याध्यापक एस. के. पाटील, विद्यालयाच्या प्राचार्या साधनाताई डोईफोडे, तसेच विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. सागर रंधवे आणि ज्योत्स्ना ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रमोद कोळी यांनी आभार मानले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply