Breaking News

भाजप उरण तालुका उपाध्यक्षपदी पंडित घरत

उरण ः वार्ताहर

येथील पंडित तथा पंढरीनाथ नामदेव घरत यांची भाजप उरण तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी पंडित घरत यांना देऊन अभिनंदन केले.

या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, भाजप उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, उरण तालुका युवा अध्यक्ष शेखर तांडेल, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, पंडितशेठ घरत, मनन पटेल, मनोहर सहतीय आदी उपस्थित होते.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply