पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्माने ओबीसी समाजातील नाहीत, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. या विरोधात देशभर संतापाचा भडका उडाला असून भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये महिला मोर्चा आणि युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांचा तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी राहुल गांधींसह काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालय येथे झालेल्या या निषेधावेळी पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, अमित ओझे, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष राजेश्री वावेकर, सुहासिनी केकाणे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, दिनेश खानावकर, रोहित जगताप, शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, रूपेश नागवेकर, विनायक मुंबईकर, प्रीतम म्हात्रे, केदार भगत, चंद्रकांत मंजुळे, अभिषेक भोपी, कोमल कोळी, संदीप पाटील, तेजस जाधव, देवांशू प्रभाळे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासकामांचा धडाका पाहून विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे. विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाहीत आणि त्यामुळेच ते जातीपातीचे मुद्दे काढत आहेत, असा आरोप या वेळी करण्यात आला तसेच मोदीजींचा अपमान देश सहन करणार नाही, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
Check Also
कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक
कठोर उपाययोजना करणार -वनमंत्री गणेश नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील आंबा व काजू बागांचे वणव्यांमुळे …
RamPrahar – The Panvel Daily Paper