Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले सपोनि. सुभाष पुजारी यांचे अभिनंदन

पनवेल ः वार्ताहर

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आल्याने 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पत्रकार संजय कदम उपस्थित होते.

पोलीस खात्यामध्ये विविध विभागात कर्तव्य बजावित असताना त्यांनी केलेली कामगिरी तसेच शरीरसौष्ठव खेळामध्ये त्यांनी 2021 व 2022 चा महाराष्ट्र श्री व भारत श्री किताब सलग दोनवेळा मिळविला आहे. तसेच ताश्कंद उझबेकिस्तान या ठिकाणी झालेल्या वर्ल्ड बॉडीबिल्डिंग अँण्ड फिजिक या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये त्याने 80 किलो गटामध्ये ब्रान्झ मेडल मिळवले आहे व सध्या 15 जुलै रोजी मालदीव येथे होणार्‍या मिस्टर आशिया व नोव्हेंबरमध्ये होणार्‍या मिस्टर वर्ल्ड या शरीरसौष्ठवाची स्पर्धेची ते तयारी करत असल्याबद्दल सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply