Breaking News

भाजप प्रभाग 9, 10ची बैठक

नवी पनवेल ः रामप्रहर वृत्त

पुन्हा आणू या, आपले सरकार या शीर्षकाखाली भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या वतीने महापलिका प्रभागांमधील कार्यकर्त्यांच्या बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 9 आणि 10ची बैठक शुक्रवारी कळंबोलीमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीने प्रभाग क्रमांक 9 आणि 10च्या कार्यकर्ता बैठकीत विविध पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या बैठकीला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महिला मोर्चा अध्यक्षा रत्नप्रभा घरत, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अमर पाटील, राजेंद्र शर्मा, महादेव मदे, नगरसेविका विद्या गायकवाड, प्रमिला पाटील, मोनिका महानवर, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी सरपंच अरुण पाटील,  बुधाजी ठाकूर, राजेंद्र बनकर, यशवंत ठाकूर, संतोष बांदेकर आणि निशा भारती, भास्कर पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, प्रभाग 10 अध्यक्ष संदीप भगत, जनार्दन पाटील, जमीर शेख, बबन बारगजे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी भाषण केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply