Breaking News

लॉकडाऊनमध्ये दूधविक्रीला सवलत

म्हसळा ः प्रतिनिधी

लॉकडाऊन काळात गर्दी कमी करण्याकरिता महसूल, पोलीस, म्हसळा नगरपंचायत व व्यापारी असोसिएशनच्या वतीने 22 एप्रिल ते 3 मे या कालावधीत बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तो बुधवारी यशस्वी झाला. यात ग्राहकांनी संबंधित किराणा व्यापार्‍याला व्हॉट्सअ‍ॅपवर मालाची ऑर्डर द्यायची व व्यापार्‍याने ग्राहकाला माल पोहच करण्याचे

सांगण्यात आले. या वेळी दूधविक्रीचा निर्णय योग्य झाला नसल्याने सकाळपासून बाजारात दुधाची बोंब झाल्याने प्रशासनाने गुरुवार (दि. 23)पासून सकाळी 7 ते 9 या कालावधीत दूधविक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेतला. म्हसळा शहरात दूधविक्रीचे स्वतंत्र दुकान नसल्याने व बहुतांश दूध विक्री केंद्र दुधासोबत अन्य वस्तूंची विक्री करीत असल्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला हरताळ फासला जाण्याची शक्यता आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply