नवी पनवेल ः रामप्रहर वृत्त
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन पनवेलमधील कर्नाटक हॉल येथे शनिवारी उत्तर भारतीय मोर्चा कार्यकर्ता मेळावा यशस्वी झाला.सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी विविध पदांच्या नियुक्ती करण्यात आल्या. नवीन पनवेल येथे उत्तर भारतीय मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी झाला. या वेळी विविध 37 पदांवर नियुक्त्या देखील करण्यात आल्या. सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्रक प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक संतोष शेट्टी, नगरसेविका राजश्री वावेकर, उत्तर भारतीय प्रकोष्टच्या अध्यक्षा निशा सिंग, जितेंद्र तिवारी, बी. पी. सिंग, सुनिल विश्वकर्मा, भास्कर शेट्टी, हेमंत सिंग, डी. एस. सिंग, आर. पी. यादव, सुनिल सिंह, विनोद ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापलिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.