Breaking News

धवनबाबतचा निर्णय अफगाणविरुद्धच्या सामन्याआधी

लंडन : वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमधून लवकर सावरण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे टीम इंडिया लवकरच दुखापतग्रस्त शिखर धवनविषयी अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसात शिखर धवनच्या दुखापतीविषयी पुन्हा परीक्षण केलं जाईल. त्यानंतर संघाचे फिजिओ पॅट्रिक फारहार्ट धवनच्या खेळण्याविषयी अंतिम निर्णय घेतील. अफगाणिस्तानविरुद्धच्या (22 जून) सामन्याआधीच हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच इंग्लंडला रवाना झालेला रिषभ पंत जोमाने सराव करत आहे. दुखापतग्रस्त शिखर धवनचा संभाव्य पर्याय म्हणून युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या नावाची अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही. पण खबरदारीची उपाययोजना म्हणून त्याला विश्वचषक मोहिमेवर पाठवण्यात आलं आहे. रिषभ पंतने एक धडाकेबाज फलंदाज म्हणून अल्पावधीत आपली ओळख निर्माण केली आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply