Breaking News

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धनमध्ये पोलीस संचलन

श्रीवर्धन : प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक नि:पक्षपातीपणे व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने यंत्रणेला आचारसंहितेचे अतिशय काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने शनिवारी (दि. 5) संध्याकाळी श्रीवर्धन पोलीस ठाण्यातर्फे शहरात संचलन करण्यात आले.  विधानसभा निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी श्रीवर्धन शहरातील एसटी स्टॅण्ड, शिवाजी चौक, बाजारपेठ, मोगल मोहल्ला, प्रभू आळी, पेशवे स्मारक ते पोलीस ठाणे मार्गावरून शनिवारी संध्याकाळी पोलीस संचलन करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी बाबूराव पवार, श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक पी. डी. बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अली मुल्ला, म्हसळा पोलीस निरीक्षक  खेडेकर,  दिघी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेंद्र शेलार यांच्यासह श्रीवर्धन, म्हसळा, दिघी पोलीस ठाण्यातील चार अधिकारी, 18 कर्मचारी व 12 होमगार्ड्स सहभागी झाले होते.

श्रीवर्धन मतदारसंघातील नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे. पोलीस आपल्या सहकार्यासाठी सदैव तत्पर आहेत.

-पी. डी. बाबर, पोलीस निरीक्षक, श्रीवर्धन

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply