Breaking News

झंकार नवरात्रोत्सवात अवतरली ‘सर्कस’

पनवेल : रामप्रहर वृत्त

आदिशक्तीचा जागर रविवारपासून मोठ्या उत्साहात सर्वत्र सुरू आहे. त्यानिमित्त पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने झंकार नवरात्र उत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत या उत्सवात रविवारी सर्कस ही थीम होती. या थीमला विशेषतः लहान मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी पनवेल महापलिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते. पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा झंकार नवरात्रोत्सवाचे हे 13 वे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्साहात झंकार नवरात्रोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त रविवारी सर्कस ही थीम ठेवण्यात आली होती. या वेळी उत्तम नृत्य करणार्‍यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. या वेळी अर्चना परेश ठाकूर, उद्योजक राजू गुप्ते, भाजपचे शहर सरचिटणीस अमरिश मोकल, सुहासिनी शिवणेकर, मोतीलाल जैन, संजय जैन, सुमित झुंजारराव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply