कर्जत : प्रतिनिधी
येथील रेम्बो बुडोकॉन कराटे अॅकॅडमीच्या खेळाडूंनी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या एशियन ओपन कराटे कप स्पर्धेत सुयश संपादन केले आहे. कर्जतच्या 13 कराटेपटूंनी 4 सुवर्ण, 5 रौप्य व 14 कांस्य अशी 23 पदके व बेस्ट टीम ट्रॉफी पटकावली. या खेळाडूंची दुबईत होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यामध्ये तन्मय पाटील, वसंत शेट्टी व धु्रव परदेशी यांनी प्रत्येकी एक सुवर्ण व एक रौप्यपदक, धीरज कांबळे एक सुवर्ण व एक कांस्य, गौरव नरे एक रौप्य व एक कांस्य, यश भोसले व विशाल गायकवाड एक रौप्य, सुरज दातीर, साहिल पवार, आशितोष ताम्हाणे, भूषण बडेकर, नरेश बडेकर प्रत्येकी दोन कांस्य, तर सुजल भोईरने एक कांस्यपदक पटकाविले आहे.
सर्व यशस्वी स्पर्धक रेम्बो अॅकॅडमीत वसंत शेट्टी, नरेश बडेकर, विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. त्यांचे अभिनंदन होत आहे.