Breaking News

स्पुटनिक व्ही लस दृष्टिक्षेपात

पुढील आठवड्यापासून होणार उपलब्ध

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना स्पुटनिक व्ही लसीच्या रूपाने आता काहीसा दिलासा मिळणार आहे. स्पुटनिक व्ही लस पुढील आठवड्यापासून मिळणार असल्याची माहिती नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली आहे. स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप भारतात आली आहे. तसेच दुसरी खेप शुक्रवारी भारतात पोहचणार आहे. रशियातून आलेल्या लसींची लवकरच विक्री सुरू होईल, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी सांगितले आहे.
‘स्पुटनिक व्ही’ लसीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात आली होती. आता लसीची दुसरी खेप शुक्रवारी भारतात पोहचणार आहे. भारतात स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती रेड्डीज लॅबोरेटरीज करणार असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लसीस केंद्रीय औषध प्रमाणन व नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे. या लसीचे उत्पादन जुलै महिन्यात सुरू होईल, असेही वीके पॉल यांनी सांगितले. लसीचे 15.6 कोटी डोस तयार केले जाणार आहेत, तर भारतीयांसाठी ऑगस्ट-डिसेंबरदरम्यान 216 कोटी डोस तयार केले जातील.
भारताच्या औषध महानियंत्रकांनी जानेवारीत भारत बायोटेकची कोवॅक्सिन व ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या सीरमने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड लसींना मान्यता दिली होती. स्पुटनिक व्ही लस आयात करण्याची परवानगी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने मागितली होती. ही लस मे. गमालिया इन्स्टिट्यूट यांनी तयार केली असून लसीच्या उत्पादनासाठी रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांच्याशी करार केला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply