Breaking News

‘आ. प्रशांत ठाकूर यांना निवडून देणार’

पनवेल : प्रतिनिधी

आमदार प्रशांत ठाकूर म्हणजे  निष्कलंक, सगळ्यांशी जुळवून घेणारे नेतृत्व असून पनवेलच्या विकासासाठी पनवेलकर त्यांना पुन्हा प्रचंड मतांनी निवडून देतील, असा विश्वास प्रभाग 17 चे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. कार्यकर्त्याच्या डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी असली पाहिजे, असे कै. रामभाऊ म्हाळगी नेहमी म्हणत असत. प्रशांत ठाकूर यांच्या बाबतीत ते खरे ठरले आहे. त्यांच्या वागण्यात हे नेहमी आपल्याला पाहायला मिळते. आपले जीवन त्यांनी पनवेलकरांसाठी समर्पित केले आहे. प्रशांत ठाकूर म्हणजे उत्तुंग व्यक्तिमत्त्व, शिस्तबद्ध  आणि प्रोटोकॉल पाळणारे. कोणत्याही विषयाचा अभ्यास करून पाठपुरावा करणारे व्यक्तिमत्त्व. त्यामुळेच या वेळी आम्ही विधानसभा निवडणुकीत अब की बार एक लाख पार, हे उद्दिष्ट ठरवले आहे.

आमदार प्रशांत ठाकूर मनमिळावू स्वभावाचे, विरोधासाठो विरोध अशी राजकीय विरोधकाची भूमिका न ठेवता, वैचारिक विरोध करणारे आहेत, जो गरजेचा आहे. रायगड जिल्ह्यात संघटनेचे काम निःस्वार्थी आणि निष्कलंक पद्धतीने करीत आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन काम करतात. कोणताही निर्णय एकतर्फी घेत नाहीत, अदबशीर बोलणारा, लोकप्रतिनिधी कसा असावा, याचे उदाहरण म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर असेच म्हणावे लागेल. म्हणूनच आमचे रायगड जिल्हा संघटन मंत्री श्रीनंद पटवर्धन म्हणतात, भाजपला सापडलेला हा कोहिनूर हीरा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळेच त्यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले. प्रशांत ठाकूर संघाच्या तालमीत तयार झाले नसले, तरी संघ कार्यकर्त्यापेक्षा जास्त शिस्त पाळतात. त्यांना अप्पासाहेब धर्माधिकारींचे आशीर्वाद मिळाले आहेत. पनवेलकरांसाठी आपले जीवन समर्पित करणार्‍या प्रशांत ठाकूर यांना या वेळी लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणणार असल्याचे मनोज भुजबळ यांनी सांगितले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply