Breaking News

महिलावर्गही कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी, अबोली रिक्षा संघटनेचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना समाजाच्या सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत असून, येथील अबोली रिक्षा महिला संघटनेने आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे मंगळवारी (दि. 15) पाठिंबापत्र सुपूर्द केले.

या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, अतुल पाटील, अबोली रिक्षा संघटनेच्या उपाध्यक्ष शालिनी गुरव, ललिता राऊत, आशा तागड, सुनीता जाधव, मनीषा देशमुख, मंगल पाटील, अरुण दडस, अश्विनी शितोळे, अनिता पाटील, जयश्री देशमुख, रोहिणी दास, सीमा नरवडे, अर्चना पवार, ज्योती पिसाळ या महिला रिक्षाचालकांसमवेत प्रिंट पॉइंटचे संचालक संतोष सुतार व ‘वर्धमान संदेश’चे संपादक सुनील कटेकर उपस्थित होते.

महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांचा हातभार लागावा, या हेतूने संतोष भगत यांनी अबोली रिक्षा संघटनेची स्थापना केली. भारतीय जनता पक्षदेखील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सतत प्रयत्नशील असतो. म्हणूनच आमदार प्रशांत ठाकूर यांना या संघटनेचे पदाधिकारी व महिला सदस्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply