Breaking News

शेकापला धक्का : लाल ब्रिगेड अध्यक्षासह पदाधिकारी भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त

शेकापच्या लाल ब्रिगेड संघटनेचे पनवेल शहर अध्यक्ष संतोष सुतार व सहकार्‍यांनी सोमवारी (दि. 14) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वांचे स्वागत केले.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास जि. प. सदस्य अमित जाधव, भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस अमरिश मोकल आदी उपस्थित होते. पनवेल विधानसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश सुरूच आहे. खासकरून शेतकरी कामगार पक्षाला मेगागळती लागली आहे. अशातच शेकापच्या लाल ब्रिगेड संघटनेचे पनवेल शहर अध्यक्ष संतोष सुतार, उपाध्यक्ष धनंजय घोट, जितू सुतार, अजित सिंग, स्वप्नील घाटे, चेतन घाटे, रोशन घाटे, वैभव घाटे, प्रकाश सुतार, जयेश घाटे, राजेंद्र सुतार, मयुर परदेशी, भावेश पाटील, गौरव भगत, जितेंद्र सरोर, चेतन भोपी यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply