पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल मधील् तरूणांचे लाडके नेतृत्व आणि श्रीमंत असून ही जमिनीवर पाय असलेले नेतृत्व म्हणजे सिडकोचे विद्यमान अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर असेच म्हणावे लागेल. ज्यांच्या डोक्यात सत्ता आणि पैसा याची नशा गेलेली नाही. प्रशांत दादा आपले वडील माजी खासदार रामशेठ ठाकुर यांचा राजकीय वारसा घेऊन आलेले राजकारणातील नेतृत्व असल्याने सामान्य कार्यकर्ते आमदार म्हणजे आपला घरचा समजून त्यांच्याकडे जातात. प्रशांतदादा त्यांना शक्य असलेली मदत करतात. त्यामुळे आमच्या सगळ्या नगरसेवाकांनी प्रशांत दादांना ’ ड ’ प्रभागातून 20 हजारापेक्षा जास्त मतांची आघाडी मिळवून देण्याचा निर्धार केला असल्याचे पनवेल महापालिकेच्या प्रभाग ड चे अध्यक्ष तेजस कांडपिळे यांनी सांगितले
आमदार प्रशांत दादांकडे आजच्या तरूणाईसाठी व्हीजन आहे. त्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे यासाठी ते प्रयत्नशील असतात. पनवेल मध्ये असलेल्या आयटीआयचा वापर करून येथील तरूणाला येथेच रोजगार उपलब्ध करून देण्याचे आमदार म्हणून त्यांचे व्हीजन होते. तरूणांच्या व्यवसाय वृध्दीसाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. सतत पाच वर्षे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 25 हजार पेक्षा जास्त तरूणांना रोजगार उपलब्ध करुण देण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळेमाझ्या सारखे तरूण त्यांचे कार्यकर्ते बनले आहेत.पनवेल मध्ये महापालिका स्थापन करण्यापासून येथील रस्ते आणि मूलभूत सुधारणा करताना त्यांनी भविष्यात पनवेल शहराची होणारी वाढ कशी असेल याचा त्यांनी दूरदृष्टीने केलेला विचार आपल्याला पाहायला मिळत आहे. येथील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना सिडकोचे अध्यक्षपद मिळाले असेच म्हणावे लागेल. त्याचा फायदा त्यांनी विस्थापिताना नक्कीच करून दिला अनेक प्रश्न मार्गी लागले. महापालिकेत सिडकोहद्दीतील प्रभाग हस्तांतर करताना येणार्या अडचणी दूर करणे शक्य झाले. गरजेपोटी विस्तार केलेल्या घरांचा प्रश्न यासारखे प्रश्न मार्गी लागल्याचे पाहायला मिळतात.
आज पनवेल महापालिका हद्दीत सिडको वसाहतीत कोंस्मोपोंलिटिन समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजात त्यांच्या बद्दल आपुलकी असल्याचे महापालिका निवडणुकीत पाहायला मिळाले आहे. आमच्या ड प्रभागात मोठ्या प्रमाणात असलेला हा समाज या वेळी ही प्रशांत दादांच्या बरोबर राहील. पनवेल तालुक्यात भाजप मध्ये ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शेकापचे कार्यकर्ते येत असल्याचे दिसून येत आहे. पनवेल मध्ये भाजपशिवाय कोणी ही शिल्लक नाही अशी परिस्थिति आहे. पूर्वी शेकापवाले नेहमी विरोधकांना सांगायचे आमच्या जेवढ्या बैलगाड्या पनवेलमध्ये येतील त्यापेक्षा तुम्हाला एक मत मत कमी पडेल. आज प्रशांत ठाकुर यांनी एवढे काम केले आहे की आज त्यांचे विरुध्द उमेदवार शोधताना शेकापची दमछाक झालेली आपल्याला पाहायला मिळाली.