पनवेल ः प्रतिनिधी
दानशूर व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 72वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 30 ते 31 मेपर्यंत न्हावेखाडी क्रिकेट क्लबच्या वतीने न्हावेखाडी उत्तरपाडा येथील श्री महेश्वरी मैदानावर लोकनेते रामशेठ ठाकूर चषक 2023 प्रकाशझोतातील भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास दोन लाख रुपये व भव्य चषक, तर उपविजेत्या संघास एक लाख रुपये व भव्य चषक, मालिकावीरास मोटरसायकल व चषक, तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकास प्रत्येकी 10 हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
ग्रामस्थ मंडळ न्हावेखाडी व श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने 1 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता श्री म्हसेश्वर मंदिर न्हावेखाडी रामबाग येथे सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर यांच्या सुमधूर आवाजातील मराठी हिंदी जुनी-नवीन गाणी, कोळीगीत, चित्रपटगीत, लावणी आणि गझलांची सायंकालीन मैफिल होणार आहे. 2 जून रोजी सायंकाळी 6 ते 8 दरम्यान सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसाद, तर त्याचदिवशी सायंकाळी 7.30 वाजता स्टेप आर्ट डान्स अकॅडमी प्रस्तुत पप्पू सूर्यराव निर्मित आणि गायक योगेश आग्रावकर, गायक अमोल जाधव, हास्य कलाकार सुशांत पाटील अशा अनेक कलाकारांचा समावेश असलेला ’जल्लोष सुवर्णयुगाचा’ हा नृत्य आणि हास्य मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष व न्हावे ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, मंदिर कमिटीचे अध्यक्ष सी. एल. ठाकूर आणि न्हावे क्रिकेट क्लबने केले आहे.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …