उरण ः प्रतिनिधी
उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा सारडे आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानरचनावादाला सतत प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतानाच आज शेतकर्यांना शेतीमध्ये कोणतेही पीक घेताना किती कष्ट करावे लागते, याचा व भात झोडणीचा प्रत्यक्ष अनुभव सारडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतावरील भाताच्या पेरावर जाऊन घेतला आहे. तसेच पीक कमी आणि जास्त वाढत आहे. तरी पण आज शेतकरी शेती करत आहे. हा शेतकरी किती कष्ट करतोय, याचा व भात झोडणीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी सारडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन घेतला आहे. या वेळी उपसरपंच शामकांत पाटील, मुख्याध्यापिका ऊर्मिला म्हात्रे, समृद्धी वर्हाडी, शिक्षक कौशिक ठाकूर, तंत्रस्नेही शिक्षक सुनील नर्हे व विद्यार्थी उपस्थित होते.