पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याअंतर्गत खारघर विभागातील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये मंगळवारी जाहीर पक्षप्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
भारतीय जनता पार्टीच्या खारघर येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशात शेकपचे ओवे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बाळाराम पारदी, बाळू पारदी, शिगो पारदी, हिरामण पारदी, चंद्रकांत पारदी, काळुराम भगत, नागेश पारदी, बळी पारदी, बुद्या पारदी, केशव कातकरी, पदू मेगाल, सुभाष पारदी यांनी ओवे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अब्दुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, प्रभाकर जोशी, भाजपचे खारघर शहर उपाध्यक्ष सुरेश ठाकूर, राजेंद्र मांजरेकर, सरचिटणीस दीपक शिंदे, प्रभाग क्रमांक 5 अध्यक्ष लकवीस सैनी, अनिल सावणे, अजय माळी, रमेश खडकर, किशोर जाधव, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने
उपस्थित होते.