Breaking News

आवरे मॅरेथॉनवर कल्पेश देवरे आणि संदीप पाल यांची मोहोर

प्रतिनिधी (आवरे )

एक धाव आरोग्यासाठी, पूर्वजांच्या स्मरणासाठी, उरण पूर्व विभागात राबवित असलेल्या निगा फाउंडेशन तर्फे सोमा रामा गावंड मॅरेथॉन ही रायगड जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन संलग्नित मिनी मॅरेथॉन स्पर्धा आणि या स्पर्धेत 10 किमी या खुल्या गटात पुरुष व महिला गटात ऋतुजा सकपाल आणि संदीप पाल या स्पर्धकांनी वर्चस्व गाजविले. या कार्यक्रमात पुलवामा येथील भारतीय शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

स्पर्धेचे उद्घाटन आवरे गावच्या सरपंच राजश्री गावंड, जितेंद्र चिरलेकर, नीलेशभाई म्हात्रे, मनोज गावंड, धनेश गावंड, भाईचंद गावंड, महादेव गावंड प्रेमालता गावंड, प्रेमा पाटील, रजनी मुंगाजी, अतुल म्हात्रे, रमेश मुंगाजी यांच्या हस्ते झाले, तसेच कार्यक्रमाला रायगडभूषण राजू मुंबईकर, हास्यसम्राट व सिनेकलाकार कॉमेडी एक्स्प्रेस किंग भूषण कडू, विकास समुद्रे, श्रीकांत मुंबईकर, अजित तीलगुडकर, राजेश मदगवकर, नीलेश गावंड, निवास गावंड, विलास गावंड, विनोद गावंड, मुकुंद गावंड, हरेंद्र गावंड, समर्थ चषकाचे आयोजक माधव म्हात्रे, दिनेश म्हात्रे, आबा पाटील (गोल्डन जुबली), बाबदेव क्रिकेट क्लब (पाले)चे संदीप गावंड, सुरेंद्र म्हात्रे, हनुमान म्हात्रे, जाणता राजा ग्रुप वशेणीचे देविदास पाटील, विशाल म्हात्रे, ओमकार म्हात्रे, सारडे विकास मंचचे नागेंद्र म्हात्रे, रोशन पाटील, संपेश पाटील, मंगेश म्हात्रे प्रीतम स्पोर्ट्सचे प्रशांत म्हात्रे, जितेंद्र थळी, गणेश थळी, प्रेम म्हात्रे, शेखर म्हात्रे, आर. के. म्हात्रे, तुलसीदास पाटील, मनोज कडू, मच्छिंद्र वर्तक आदी उपस्थित होते.

3 किमी मुलांमध्ये कल्पेश देवरे (प्रथम), पृथ्वीराज (द्वितीय), राज गावंड (तृतीय), आवेश (चतुर्थ), ऋशिकेश (पाचवा); 3 किमी मुलींमध्ये श्रेया (प्रथम), सलोनी (द्वितीय), सिद्धी (तृतीय), श्रावणी गावंड (चतुर्थ); 10 किमी मुलांमध्ये संदीप पाल (प्रथम), राम पारधी (द्वितीय), अक्षय जितेकर (तृतीय), किशोर मर्कट (चतुर्थ), आकाश पाटील (पाचवा); 10 किमी ऋतुजा सकपाल (प्रथम), प्रतीक्षा कुलथी (द्वितीय), कोमल खांडेकर (तृतीय), मनस्वी दवन्दे (चतुर्थ), संकेता पाटील (पाचवी) विजेते ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर पाटील, जेएनपीटी स्कूलचे शिक्षक आर. सी. ठाकूर यांनी केले व आभार विलास पाटील यांनी मानले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान

पनवेल : प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि.21) …

Leave a Reply