Breaking News

गणपतीची पूजाही यंदा ऑनलाइन

पुरोहित करणार फेसबुक, झूम माध्यमांचा वापर

पनवेल : बातमीदार
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि प्रतिबंधित क्षेत्र विचारात घेऊन शहरांतील काही पुरोहितांनी फेसबुक, झूम आदी तंत्रस्नेही माध्यमांद्वारे गणपतीची भाविकांना यथासांग पूजा सांगण्याचा निर्णय घेतला आहे.
परिसरांतील अनेक पुरोहित गणेशोत्सवात गणेशपूजनासाठी नियमित भक्तांच्या घरगुती, सार्वजनिक गणपतींच्या प्रतिष्ठापना करून देतात. काही पुरोहित मुंबई, नवी मुंबईस अन्य भागांतही गणपती पूजनासाठी जातात. यंदा कोरोना साथीमुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. बहुतांशी शहरांत अद्यापही कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. अनेक भागांत तीव्र संक्रमित, प्रतिबंधित क्षेत्र कायम आहेत. याशिवाय अनेक निवासी इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. तेथे जाण्या-येण्यावर निर्बंध आहेत. अशा संक्रमणात गणेशभक्त अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर काही पुरोहितांनी फेसबुक, झूम माध्यमांद्वारे भाविकांना गणपतीची यथासांग पूजा सांगण्याची तयारी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव, शासनाचे नियम यामुळे सर्वच ठिकाणी पुरोहित गणेशपूजनासाठी पोहोचतील की नाही याची खात्री नाही. लोकल्सही बंद आहेत. खासगी वाहन भाड्याने घेऊन फिरणे शक्य नाही. गणेशभक्तांची अडचण विचारात घेऊन ऑनलाइन पूजा सांगतली जाणार आहे. 

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply