Breaking News

महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर दिसू लागला विकास

महापालिकेत समाविष्ट झाल्यावर आपल्या गावाचा आणि शहराचा विकास होईल अशी येथील नागरिकांनी  अपेक्षा केली होती. त्यांची अपेक्षा आता पूर्ण होताना त्यांना दिसत आहे. पनवेल महानगरपालिकेने सुरू केलेल्या विकासकामाच्या झपाट्यामुळे आपले गाव व आपले शहर महापालिकेत सामील झाल्याने आज त्यामध्ये होत असलेला बदल पाहून तेथील नागरिकांना महापालिकेत सामील झाल्याबद्दल  निश्चितच समाधान वाटले असेल.

पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झाली त्या वेळी 110 चौ. किमी क्षेत्रफळ असलेल्या या महानगरपालिकेत सिडको नोड, पनवेल नगर परिषद आणि एमएमआरडीए क्षेत्रातील 29 महसुली गावांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला होता. या 29 गावांतील 69 गावठाण क्षेत्रात  पुरेशा मूलभूत सुविधाही उपलब्ध नव्हत्या. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांनी महापालिकेमार्फत त्या गावांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मे. यश इंजिनियरिंग कन्सल्टंट प्रा. लि. या सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यात आली.

या संस्थेने 69 गावठाणांचे सर्वेक्षण करून आपला अहवाल दिला. निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने मूलभूत सुविधा पुरवण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात स्ट्रीट लाईटचे काम हाती घेण्याला 23 जानेवारी 2018च्या महासभेत मंजुरी देण्यात आली. त्याची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. गावठाण क्षेत्राच्या सर्व पायाभूत सेवा सुविधांसह एकत्रित विकास करण्यासाठी येणार्‍या अडचणी व निधी उपलब्धेतच्या दृष्टीने पथदर्शी प्रकल्प राबवण्यास आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले त्यासाठी   धानसर (ग्रामीण भाग), कोयनावेळे (प्रकल्पग्रस्त विस्थापित गाव), करवले (ग्रामीण भाग) आणि रोडपाली (सिडको समाविष्ट क्षेत्रातील गाव) या चार गावांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यामध्ये जलनिःसारण, मलनिःसारण, भूमिगत विद्युत पुरवठा आणि रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे. यासाठी 46 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रोडपाली या गावाचा स्मार्ट गावामध्ये समावेश करण्याचे कारण हे गाव सिडकोने विकसित केलेल्या वसाहतीजवळ असूनही या गावाचा विकास झालेला नाही. कोयनावेळे हे प्रकल्पग्रस्तांचे  गाव म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे.

त्यासाठी धानसरसाठी 10 कोटी 65 लाख 18 हजार रुपये, कोयनावेळेसाठी 15 कोटी 22 लाख रुपये, करवलेसाठी 12 कोटी रुपये आणि रोडपालीसाठी 12 कोटी 73 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी पुढील 10 वर्षातील लोकसंख्या गृहीत धरून सुविधा करण्यात येणार आहेत. यामध्ये मुख्यतः  पाणीपुरवठा, गटार, इलेक्ट्रिक लाईन, सार्वजनिक शौचालय आणि रस्ते यांचा समावेश असणार आहे. रोडपाली या गावांचा स्मार्ट गावामध्ये समावेश करण्याचे कारण हे गाव सिडकोने विकसित केलेल्या वसाहतीजवळ असूनही या गावाचा विकास झालेला नाही. कोयनावेळे हे प्रकल्पग्रस्तांचे गाव म्हणून त्याची निवड केली आहे. स्मार्ट गावांसाठी अंदाजित  एकूण रक्कम 38 कोटी रुपये आहे. यामध्ये पाणीपुरवठ्याच्या रकमेचा समावेश नाही. याबाबतचा विस्तृत प्रकल्प अहवाल बनवल्यानंतर किंवा तांत्रिक मंजुरी मिळाल्यावर त्यामध्ये वाढ किवा घट होऊ शकते. प्रत्यक्षात काम सुरू झाल्यावर परिस्थितीनुसार कामात काही फेरबदल होऊ शकतो. 10 टक्केपेक्षा जास्त फेरबदलास मान्यता देण्याचा अधिकार स्थायी समितीला देण्यात आले आहेत. या कामासाठी राज्य शासन किवा केंद्र शासनाच्या योजनांमधील निधी मागण्यास किंवा महानगरपालिकेच्या उपलब्ध निधीमधून काम हाती घेण्यास मान्यता देण्यात आली असून यासाठी कोणत्या निधीमधून काम पूर्ण करावे याचा निर्णिय आयुक्त घेतील.

महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागात कामे करीत असतानाच महापालिकेने शहरी भागातही विकासकामांचा झपाटा लावला आहे असेच म्हणावे लागेल. शनिवार 2 मार्च रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते पुढील कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

1. मनपा हद्दीतील गावांमध्ये स्ट्रीट लाईट पोल उभारणे, कामोठे, (9 कोटी 33 लाख 26 हजार रुपये)

2. वडाळे तलाव सुशोभीकरण (5 कोटी 49 लाख 93 हजार रुपये)

3. नॅशनल परेडाईज सोसायटी ते गोदरेज स्काय गार्डन ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ते पनवेल रेल्वे स्टेशन रस्त्याचे काँक्रिटीकरण (19 कोटी 06 लाख 86 हजार रुपये)

4. प्रॉपर्टी क्रमांक 1033 अ मध्ये समाजमंदिराचे काम (3 कोटी 10 लाख 65 हजार रुपये)

5. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण (1 कोटी 42 लाख 54 हजार रुपये)

6. प्राथमिक मराठी कन्याशाळा (108 कोटी 78 लाख 3 हजार रुपये)

या वेळी पालकमंत्र्यांनी आपण दरवर्षी मराठी गौरव दिन साजरा करतो, पण राज्यातील बहुसंख्य मराठी शाळा बंद होत असताना पनवेल महापालिकेने नवीन मराठी शाळेच्या बांधकामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल महापौर आणि नगरसेवकांचे कौतुक करून अशा शाळेच्या पाठीमागे तिची जबाबदारी स्वीकारण्यास शासन उभे राहील, असा विश्वास दिला आणि महापालिकेत आलेल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळाही वर्ग करून घेण्यास सुचवले. पनवेल शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण, वडाळे तलावाचे सुशोभीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. ही कामे 18 ते 24 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे पनवेलमधील नागरिकांना त्याचा आनंद घेता येणार आहे.

पनवेल रेल्वे स्टेशन हे भविष्यातील सर्वात मोठे रेल्वे टर्मिनस होणार असल्याने महापालिकेने या स्टेशन परिसरातील कामेही हाती घेतली आहेत. प्रभाग 20 मधील नगरसेवक तेजस कांडपिळे यांची अनेक दिवस  मागणी असलेला पनवेल रेल्वे स्टेशन ते राष्ट्रीय महामार्ग यांना जोडणार्‍या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी 6 कोटी 9 लाख रुपये मंजूर करून त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आल्याने बाहेरून स्टेशनवर येणार्‍या नागरिकांची चांगली सोय होणार आहे. महापालिका हद्दीत पथदिवे लावण्याचे काम बजाज इलेक्ट्रिकल कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे शहर उजळून निघणार आहे. याशिवाय रस्त्याची गटारे, समाज मंदिर, मच्छीमार्केट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा उंची वाढवणे यासारखी कामे सुरू करण्यात येत असल्याने येथील नागरिकांना महापालिका आल्यावर विकास काय असतो याची जाणीव यामुळे होणार आहे यात शंकाच नाही.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शनिवार 2 मार्च रोजी पनवेल महापालिका हद्दीतील 96 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन  करण्यात आले. त्या वेळी त्यांनी  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास याचा त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ म्हणजे  समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहचला पाहिजे हा आहे. त्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेत नगरसेवक आणि प्रशासन हातात हात घालून काम करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

Check Also

‘सीएए’ आणि गैरसमज

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीएए अर्थात नागरिकत्व दुरूस्ती कायदा देशात लागू करण्याबाबत घोषणा केली …

Leave a Reply