Breaking News

जय भारत नाका मित्र मंडळातर्फे व्यापार्यांना डस्टबिनचे डबे

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहर स्वच्छ सुंदर राहण्यासाठी व कचरा रस्त्यावर न टाकता तो डस्टबिनमध्येच टाकला जावा या उद्देशाने महाशिवरात्रीचे औचित्य साधून जय भारत नाका मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन ठेवून त्या परिसरातील व्यापार्‍यांना मोफत डस्टबिनचे वाटप करण्यात आले.मंडळाचे आधारस्तंभ शिरिष बुटाला, अध्यक्ष श्रीकांत वेदक, सल्लागार प्रवीण जाधव, उपाध्यक्ष संकेत बुटाला, सचिव राकेश भगत, खजिनदार चिरंजीव वेदक व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीचे औचित्य साधून सत्यनारायणाच्या पूजेदरम्यान स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल हे व्रत अंगीकारून या मोफत डब्यांचे वाटप दुकानदारांना करण्यात आले. या उपक्रमाचे परिसरातील व्यापार्‍यांनी कौतुक करून अशा प्रकारच्या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मंडळाने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply