पनवेल : बातमीदार
शैक्षणिक वर्ष 2019-2020मध्ये झालेल्या तलवारबाजी, खो-खो, कबड्डी, बॉक्सिंग, डॉजबॉल, तायक्वांडो, बॅडमिंटन अशा विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये इंदूबाई आ. वाजेकर शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
निमिशा धीरज थवई या विद्यार्थिनीने तलवारबाजी या खेळात सांघिक सुवर्णपदक व वैयक्तिक कांस्यपदक पटकावून राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी ती पात्र झाली आहे. सुमेध शेखर पानपाटील याने विभागीय स्तरावर रौप्यपदक प्राप्त केले. त्याची राज्यस्तरावर निवड झाली असून, अनिष प्रकाश अमृते यास जिल्हा स्तरावर रौप्यपदक मिळाले.
रायगड असोसिएशन महाराष्ट्र खो-खो संघासाठी सुरज रामदास साकेत, भावेश भारत दातार यांची निवड झाली. 17 वर्षे वयोगटात सिद्धेश गणेश पवार, सिद्धार्थ प्रवीण मोहिते, गोविंद विश्वनाथ शहा व 14 वर्षे वयोगटात रोनित पुंडलिक भगत यांची निवड झाली आहे. विभागीय स्तरावर कबड्डीमध्ये 17 वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावून प्रथमेश पृथ्वीराज बनसोडे व क्षितिज रामदास सावळे यांची निवड झाली. बॉक्सिंगमध्ये जिल्हा स्तरावर सुवर्णपदक मिळवून तनू संदीप सिंह, हर्षदा संजय पाटील व कुणाल संजय पाटील यांची विभागीय स्तरावर निवड झाली. याबरोबरच डॉजबॉल खेळात संघामधून जिल्हा स्तरावर तिसरा क्रमांक मिळवून 17 वर्षीय मुलींच्या संघातून तनू संदीप सिंह व सानिया सुदर्शन गावडे यांची, तर मुलांतून शुभम उमेश वाणी व विनय संतोष माळी यांची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत सकिना अफजल शेख, वैष्णवी संजय माचाळे, अमर ब्रह्मदेव मिसाळ यांची सुवर्णपदक मिळवून, भावेश जितेंद्र म्हात्रे, दिया देवेंद्र तळेकर, आयुष राजेश पाटील, पीयूष राजेश पाटील यांची रौप्यपदक मिळवून आणि विनीत परेश पाटील, प्रचिती पंकज पाटील यांची कांस्यपदक मिळवून विभागीय स्तरावर निवड झाली. बॅडमिंटनमध्ये 17 वर्षे वयोगटात संजित संतोष वालणकर याची विभागासाठी निवड झाली. यशस्वी खेळाडूंचे मुख्याध्यापिका मनीषा पाटील (माध्यमिक), मानसी कोकीळ (प्राथमिक), क्रीडा शिक्षिका दर्शना भोपी (प्राथमिक), खुशी कांबळे (माध्यमिक) आणि शिक्षकवृंदाने अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.