खालापूर ः प्रतिनिधी
सावरोली-खारपाङा मार्गावर धामणीनजीक एटीएम मशिन फोङण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला असून चोरट्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागले.खालापूर हद्दीत धामणी गावानजीक विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ स्टेट बँक ऑफ इंङियाचे एटीएम केंद्र आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याचे तसेच संध्याकाळी हा भाग निर्मनुष्य असल्याचे हेरून चोरट्यांनी शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास धारदार वस्तूने एटीएम मशिन कापण्याचा प्रयत्न केला, परंतु मशिनमध्ये ठेवलेल्या रकमेपर्यंत पोहचण्यात चोरट्यांला यश आाले नाही. अखेरीस चोरट्यांनी त्याच अवस्थेत पळ काढला. एटीएम मशिन कापण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आल्यानंतर बँक व्यवस्थापकांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एटीएम मशिनमध्ये नक्की किती रक्कम होती याचा तपशील मिळाला नसून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भादंवि 379, 511, 427प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगङे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमित सावंत करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास सुरू असून लवकरच चोरट्यांना पकङण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.