Breaking News

स्केटिंग स्पर्धेत ‘गुरुकुल’चे यश

मोहोपाडा : प्रतिनिधी

रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन याक पब्लिक स्कूल येथील स्केटिंग रिंकवर करण्यात आले होते. यामध्ये चौक येथील श्रीस्वामीनारायण गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

श्रीस्वामीनारायण गुरुकुलचा शेल सणस या विद्यार्थ्याने 17 वर्षांखालील क्वाड या गटात तीन रौप्यपदके, तर देव पटेल याने 14 वर्षांखालील इनलाईन गटात दोन रौप्यपदके  मिळवत नंदुरबार येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला. याशिवाय करण काकडे व आदित्य मिरकुटे यांनी विशेष प्राविण्य मिळवले. 

सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक योगेश्वरस्वरूपदास स्वामी, आत्मस्वरूपदास स्वामी, तसेच प्राचार्य जॉन्सन, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply