कळंबोली : प्रतिनिधी
कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा होत असून त्यात कोरोना रुग्णांचा जीव जात आहेत. या रुग्णांना जीवनदान मिळावे म्हणून विश्वहिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल कळंबोली समित्यांच्या वतीने सुधागड विद्यासंकुल कळंबोलीच्या सभागृहात एमजीएम रूग्णालय कामोठ्याच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 19) आयोजित करण्यात आले होते.
बजरंग दल कळंबोली समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. कोरोनाच्या महामारीने एमजीएम रूग्णालयाला रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने बररंग दल कळंबोलीला केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देवून सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर तसेच कोरोनाच्या अटी व शर्थीचे पालन करून या रक्तदान शिबिर यशस्वी करून राष्ट्रीय उपक्रमाला हातभार लावला. या वेळी 55 रक्तदात्यानी रक्तदान केले. हा उपक्रम यशस्वीतेसाठी निलेश पाटील, सुनील उतेकर, अजय सुर्यवंशी, सचिव झुंजारराव, अमित सोलंकर,संदीप सिंग आदि समितीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.