रेवदंडा : प्रतिनिधी
पुणे येथे नुकत्याच झालेल्या 39व्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील श्रीराम स्पोर्ट्स असोसिएशनच्या मल्लखांब खेळाडू यांनी सुयश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना व पुणे जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या सयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना सागमळा येथील श्रीराम स्पोर्ट्स असोसिएशनचा मल्लखांबपटू श्लोक अरुण पाटील याची 12 वर्षाखालील वयोगटात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे अनघा विजय पिटनाईक हिने साधन विजेतेपद स्पर्धेत सहावा क्रमांक व संस्कार महेश पिळणकर याने व्दितीय क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल रायगड जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र राऊत, सचिव शिरीष नाईक यांनी श्लोक, अनघा व संस्कार यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.