Breaking News

शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहा -वपोनी काईंगडे

मोहोपाडा : वार्ताहर

शिक्षण व खेळासाठी वेळ व महत्त्व द्या, असे आवाहन खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी केले. वावंढळवाडी येथील हनुमान मंदिरात काकडा आरती समाप्तीच्या दीपोत्सव कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, घरच्या मोठ्या माणसांनी सतत टीव्ही सुरू ठेवणे व मुलांच्या हातात मोबाईल असणे यामुळे क्रीडा व शैक्षणिक क्षेत्र मागे जात आहे. आपल्या परिसरात उद्योगपती, प्रशासकीय अधिकारी, ऑलिम्पिकसाठी क्रीडापटू तयार होणे काळाची गरज आहे. यासाठी मार्गदर्शन करण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी चौकचे सपोनि संजय बांगर उपस्थित होते. हभप कमलाकर काईनकर यांनी सुरू केलेल्या या कार्यक्रमाला 24 वर्ष झाली. रामदास काईनकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील तरुण व महिलांचा सहभाग या कार्यक्रमात असतो. त्यांना भिलवले, कांढरोली, आसरेवाडी, वावंढळ व विणेगाव गावातील वारकरी-माळकरी यांची साथ असते. या वेळी वन रक्षण, प्लास्टिक मुक्ती, छत्रपती शिवाजी महाराज, व्यसनमुक्ती, स्वच्छता, रागावर नियंत्रण, एकीचे बळ या विषयांवर लहान मुलांनी भाषणे केली.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply