Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेलमध्ये द्वारकादास शामकुमार शोरूमचे उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधी
अनुभव, जिद्द आणि मेहनतीने पनवेलकरांचा विश्वास मिळवल्याने आज पनवेलमधील मोजक्या मोठ्या उद्योजकांत शेळके परिवाराचे नाव आहे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
पनवेलमध्ये द्वारकादास शामकुमार ग्रुपच्या मे. द्वारकादास शामकुमार एक्सक्लुसिव्ह शोरूमच्या दुसर्‍या शाखेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 19) झाले. या वेळी अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील, रंग माझा वेगळामधील सौंदर्या- हर्षदा खानविलकर व सुख म्हणजे काय असते शालिनी- माधवी निमकर यांची प्रमुख उपस्थित लाभली. नेहा देशमुख, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, अ‍ॅड. वृशाली वाघमारे, रुचिता लोंढे, प्रिया मुकादम, प्रिती डाके आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.
द्वारकादास शामकुमार ग्रुपला शुभेच्छा देताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी, पनवेलकरांना
साडी खरेदीचे मोठे दालन उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद दिले. त्याचबरोबर उपस्थितांना साडीची निवड करा पण आपल्या अर्धांगिनीला सोबत घेऊन आल्याशिवाय करू नका, असा सल्लाही दिला. आमदार बाबासाहेब पाटील यांनी, शेळके परिवार हा आपल्या मतदारसंघातला असौन गोविंदराव यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. त्यांनी तेथे एका दुकानात नोकरी केली, मग शहरात येऊन द्वारकादास कुटुंबाचा विश्वास संपादन केला. आज त्यांच्या पनवेलसह इतर शहरात असलेल्या शाखांचा विस्तार झाला. त्याबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी, साडीखरेदी हा माझा परमोच्च आनंदाचा क्षण असल्याचे सांगून आपण त्यामध्ये जाणकार असल्याने इथे खरेदीला आल्यावर आपला एक संपूर्ण दिवस जाईल. तुम्हीही इथे खरेदीसाठी आवश्य या असे सांगून द्वारकादास शामकुमारची मुंबईला कधी शाखा सुरू होते, त्याठिकाणी मला कधी बोलवणार याची वाट पाहत असल्याचे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री माधवी निमकर यांनी, आज या ठिकाणी मी चांगला क्षण अनुभवत आहे. मला साडी नेसायला आवडते, पण त्यातील प्रकार समजत नाहीत, पण हर्षदाताईला ते चांगले समजते. आज ती सोबत असल्याने मला पनवेकरांसोबत एक चांगला क्षण अनुभवायला मिळत असल्याचे सांगितले.

Check Also

गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूरदरम्यान लवकरच ई-वॉटर टॅक्सीसेवा होणार सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर या मार्गावर इलेक्ट्रिक वॉटर …

Leave a Reply