उरण : वार्ताहर
जेएनपीटीमध्ये 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जागृती आठवडा साजरा करण्यात आला. या वेळी निबंध लेखन, पोस्टर, घोषणा, व्यंगचित्र अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. 17 ऑक्टोबर रोजी पोर्ट ग्राहकांसाठी एक चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चा सत्रासाठी शिपिंग एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी दोन कार्यशाळा घेण्यात आल्या. शासकीय निविदा प्रक्रिया व सामग्री व्यवस्थापन आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील जेएनपीटी कर्मचार्यांना सामग्री व्यवस्थापन इंडियन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. निर्णय घेणे, कार्यकारी एकाग्रता एक मार्ग या विषयांवर मर्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. निवृत्त न्यायाधीश रघुनंदन प्रसाद यांना वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते, तसेच सचोटी -जीवन एक मार्ग या विषयाचे चर्चासत्र जेएनपीटी कर्मचार्यांसाठी घेण्यात आले. सेंट मेरी जेएनपीटी विद्यार्थांसाठी नैतिक आचार माध्यमातून यशस्वी व प्रेरणा या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. प्रशासन इमारत आणि पोर्ट परिसरात पथनाट्य आयोजित करण्यात आले होते. या वेळी मुख्य दक्षता कमिटीचे अधिकारी अनिल रामटेके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.