Breaking News

विराटवर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने उधळली स्तुतिसुमने

इंदूर : वृत्तसंस्था

पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेश विरूद्ध एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला. दुसर्‍या डावात मोहम्मद शमीने घेतलेले चार बळी आणि त्याला इतर गोलंदाजांची मिळालेली साथ याच्या बळावर भारताने दणदणीत विजय मिळवला. मयांक अग्रवालने केलेल्या द्विशतकामुळे भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली होती. त्यानंतर डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव मात्र अवघ्या 213 धावांवर आटोपला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत 1-0ने आघाडी घेतली.

बांगलादेशवर डावाने मिळवलेल्या विजयासोबतच कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराटचा हा 10वा डावाने विजय ठरला. धोनीने कर्णधार म्हणून नऊ कसोटी सामन्यांमध्ये भारताला डावाने विजय मिळवून दिला होता. तर मोहम्मद अझरूद्दीनने आठवेळा हा पराक्रम केला होता. त्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने विराटचे तोंडभरून कौतुक केले आहे. टीम इंडियाचे विविध कर्णधार झाले. त्यातील अनेक कर्णधार यशस्वी ठरले. पण विराट हा भारताचा सर्वात जलद गतीने यशस्वी ठरलेला कर्णधार आहे, असे वॉनने ट्विट केले. विराटचे जगभरातूनही याबद्दल कौतुक होत आहे

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply