Breaking News

मैदानात शिवीगाळ; गोलंदाजाला दिली शिक्षा

सिडनी : वृत्तसंस्था

मैदानातच खेळाडूला शिवीगाळ करणे ऑस्ट्रेलियाच्या जलदगती गोलंदाजाला महागात पडले आहे. सामना सुरू असताना

खेळाडूबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जेम्स पॅटिन्सन याला निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध येत्या आठवड्यात सुरू होणार्‍या पहिल्या कसोटीत तो खेळू

शकणार नाही.ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात येत्या आठवड्यापासून कसोटी सामना सुरू होणार आहे. मात्र, त्याआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा दणका बसला आहे. जलदगती गोलंदाज जेम्स पॅटिन्सन याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात क्वीन्सलँडविरुद्ध शॅफील्ड शील्ड सामन्यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले. या प्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले. पॅटिन्सन नक्की काय म्हणाला, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, ’क्षेत्ररक्षण करताना त्याने एका खेळाडूबद्दल अपशब्द वापरल्याचे स्पष्ट झाले आहे’ असे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करण्याची ही त्याची गेल्या दीड वर्षातील तिसरी वेळ आहे. त्यामुळे त्याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.

Check Also

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वहाळ येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

आयडियल सेंटर डिजिटल लॅबचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये सोमवारी (दि.१५) …

Leave a Reply