Breaking News

राज्यसभा पोटनिवडणूक : भाजपच्या संजय उपाध्याय यांचा अर्ज दाखल

मुंबई ः प्रतिनिधी
राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी बुधवारी (दि. 22) मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप मुंबई  अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रदेश कोषाध्यक्ष आमदार मिहीर कोटेचा, माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, आमदार विद्या ठाकूर, आमदार योगेश सागर, आमदार गिरीश व्यास, आमदार संजय केळकर, आमदार कुमार आयलानी, आमदार राहुल नार्वेकर, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुनील राणे, आमदार तमिळ सेल्वन, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार भारती लव्हेकर उपस्थित होते.
काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 4 ऑक्टोबर रोजी ही पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली असून त्यांनीही आपला अर्ज भरला आहे.दरम्यान, भाजपच्या 12 निलंबित आमदारांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भात पत्रक काढून आपला निर्णय जाहीर केला आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply