Breaking News

वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा

पनवेल : वार्ताहर

पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर समर्थक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष फिरोज सय्यद यांनी त्यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 19) नेरेपाडा येथील स्नेहकुंज आधारवड या वृद्धाश्रमात साजरा केला. या वेळी उपस्थित वृद्धांना जीवनावश्यक वस्तूंचे तसेच ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास वृद्धाश्रमाचे संस्थापक नितीन जोशी, आयआयएफएल फायनान्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जावेद मुलाणी, लोककल्याणकारी संस्थेचे नासीर खान, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष नीलेश सोनावणे, कार्याध्यक्ष संजय कदम, सल्लागार सय्यद अकबर, प्रसिद्धी प्रमुख राज भंडारी, सदस्य मयूर तांबडे, साहिल रेळेकर, गणपत वारगडा, पत्रकार ईलियाज शेख, शादाब शेख आदी उपस्थित होते.

Check Also

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …

Leave a Reply