Breaking News

माथेरान घाटात 100हून अधिक मजूर अडकले; निवारा केंद्राचा तात्पुरता आधार

कर्जत : बातमीदार

माथेरानमध्ये एमएमआरडीएची आणि रेल्वेची कामे करण्यासाठी मजुरांना आणण्यात आले होते. त्यातील रेल्वेची कामे करण्यासाठी आलेले मजूर सध्या नेरळ-माथेरान घाटातील जुम्मापट्टी येथे अडकून पडले आहेत. नेरळ ग्रामपंचायतीकडून त्यांना तात्पुरता निवारा आणि धान्य देण्यात आले आहे, मात्र त्यांच्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा अद्याप पोहोचली नाही. त्यामुळे येत्या दिवसांत त्यांची उपासमार होण्याची शक्यता आहे.

प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये एमएमआरडीएकडून विविध विकासकामे सुरू आहेत. ही कामे करण्यासाठी लागणारा अकुशल मजूर बाहेरून आणण्यात आला असून ते सर्व नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जुम्मापट्टी येथे असलेल्या वन विभागाच्या दळी प्लॉटवर झोपड्या बांधून राहत आहेत, तर जुम्मापट्टी रेल्वेस्थानक परिसरात मिनीट्रेन मार्गावर सुरू असलेल्या कामगार आणि मजूरही तेथे राहत आहेत.संचारबंदी लागल्यानंतर एमएमआरडीएची कामे करण्यासाठी आलेले मजूर तत्काळ तेथून निघून गेले, मात्र रेल्वेची कामे करणारे मजूर आजही त्याच ठिकाणी वस्ती करून आहेत. लॉकडाऊनमुळे ते अडकून पडले असून लॉकडाऊन आणखी वाढल्या या 30 कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. विशेष म्हणजे या मजुरांना आणणारा ठेकेदार मागील 15 दिवसापांसून या

ठिकाणी फिरकला नाही. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीने अडकून पडलेल्या मजुरांना काही दिवस पुरेल एवढे धान्य दिले आहे, पण लॉकडाऊन वाढला तर काय करायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. कारण त्यांच्याकडे बघायला त्यांचा ठेकेदार नाही. 100हून अधिक मजूर त्या ठिकाणी राहत असून त्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी होत आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply