उरण : वार्ताहर
चिरनेर येथील सेकंडरी स्कूल दहावीच्या 1985 बॅचचे गेट टुगेदर अर्थात स्नेहसंमेलन रविवारी (दि. 17) राजेंद्र म्हात्रे यांच्या फार्म हाऊसमध्ये उत्साहात झाले. या वेळी या वर्गातील 24 विद्यार्थी आणि चार विद्यार्थिनी असे एकूण 28 जण उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत या ग्रुपमधील माजी न्यायाधीश चंद्रहास म्हात्रे यांनी केले. यानंतर हास्यसम्राट संजय मोकल याने सर्वांना पोट धरून हसवले. ग्रुपमधील गायक प्रकाश फोफेरकर, विजय मुंबईकर यांनी मै शायर तो नही, भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, कानडा राजा पंढरीचा, बाई मी वसईची फुलवाली, बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा, यारा तेरी यारी को, अशी गाणी गायली. मिलिंद खारपाटील यांनी चिरनेर गावावर रचलेली कविता सादर केली.
या वेळी वार्षिक सहल, पोपटी यावर मनमोकळी चर्चा झाली. या गेट टुगेदरला मिलिंद खारपाटील, चंद्रहास म्हात्रे, पद्माकर फोफेरकर, उपकार ठाकूर, राजेंद्र मुंबईकर, प्रकाश नारंगीकर, सुरेश केणी, जयदास पंडित, पंढरीनाथ नारंगीकर, सुभाष पाटील, सूर्यकांत म्हात्रे, गजानन फोफेरकर, विलास हातनोलकर, प्रमोद चिरनेरकर, चंद्रकांत गोंधळी, प्रकाश फोफेरकर, रोहिदास ठाकूर, जगदिश घरत, संजय मोकल, विजय मुंबईकर, राजेंद्र म्हात्रे, प्रभाकर ठाकूर, जयवंत नाईक, दीपक म्हात्रे, चंद्रप्रभा नारंगीकर, मालती म्हात्रे, प्रदेवी म्हात्रे, आशा फोफेरकर असे 28 जण उपस्थित होते. या वेळी नेमबाजी स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धेत जयदास पंडित आणि मालती म्हात्रे विजयी झाले.