Breaking News

नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा रंगली

पनवेल : रामप्रहर वृत्त

तरुणांना क्रीडा क्षेत्रामध्ये प्रोत्साहन मिळावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश तुपे व अजंठा ग्रुप यांच्या वतीने नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. युवा नेते मयुरेश नेतकर सोबत होते. या क्रीडा उपक्रमास नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, नगरसेविका संतोषी संदीप तुपे, पुष्पा कुत्तरवडे, प्रभाग 11चे भाजप अध्यक्ष व आयोजक रमेश तुपे, तसेच ‘मुंबई श्री’ राहुल सोनावणे उपस्थित होते. स्पर्धेत जॉर्ज इलेव्हन संघ विजेता, तर सत्यविनायक ग्रुप कामोठे उपविजेता ठरला.

Check Also

अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….

काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …

Leave a Reply