Breaking News

स्थानिक मच्छी विक्रेत्यांवर आली उपासमारीची वेळ

सुधागड-पाली ः प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील पालीमधील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस मागील अनेक महिन्यांपासून मच्छीविक्रेते बसत होते. या स्थानिक मच्छी विक्रेत्यांना पाली ग्रामपंचायतीने नुकतेच येथून हटविले आहे, पण

आजही नागोठाणे येथून येणार्‍या मच्छीविक्रेत्या ठिकठिकाणी मच्छीविक्रीसाठी बसतात. मग पाली ग्रामपंचायत कारवाई का करीत नाही? येथे बसणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करून मालाची विल्हेवाट लावली जाईल, अशा स्वरूपाचे फलक या ठिकाणी लावण्यात आले होते. मग ग्रामपंचायतीकडून कोणतीही कारवाई होताना का दिसत नाही, असा सवाल मच्छीविक्रीसाठी बसण्यास मनाई केलेले मच्छीविक्रेते उपस्थित करीत आहेत.   

नागोठणे येथून मच्छीविक्रेते पालीत येत असतात. बाहेरून येणार्‍या मच्छीविक्रेत्या पाली येथे रस्त्याच्या बाजूला ठाण मांडून बसत आहेत. या मच्छी विक्रेत्यांमुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. पादचार्‍यांना येथून मार्ग काढणे जिकिरीचे होत होते. याबरोबरच दुर्गंधीमुळे परिसरातील ग्रामस्थांना त्रास होत आहे, मात्र यावर पाली ग्रामपंचायत कारवाई करताना दिसत नाही.

ग्रामपंचायतीने स्थानिक मच्छी विक्रेत्यांसाठी बसस्थानकासमोर मासळी बाजार उभारला आहे. येथे सुधागड-पालीतील स्थानिक मच्छीविक्रेते व्यवसाय करतात, पण ते मच्छीमार्केट एक बाजूला असल्याने मच्छी खरेदीसाठी सहजासहजी ग्राहक येत नाहीत. याचे एकमेव कारण म्हणजे बाहेरून येणारे मच्छीविक्रेते बाजारपेठेत व रस्त्यालगत मच्छीविक्री करीत असल्याने मच्छी विकत घेण्यासाठी कोणीही मच्छीमार्केटमध्ये जात नाही.त्यामुळे सुधागड-पालीतील स्थानिक मच्छीविक्री करणार्‍या  मच्छी विक्रेत्यांचे अतोनात नुकसान होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही अद्याप कारवाई झाली नाही. मग स्थानिक मच्छीविक्रेत्या रस्त्यावर बसून व्यवसाय करीत असताना ग्रामपंचायत त्यांच्यावर कारवाई का करते हे न सुटलेले कोडे आहे. ग्रामपंचायतीच्या या दुजाभावमुळे स्थानिक मच्छी विक्रेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply