Breaking News

पाळीव प्राण्यांचे अनोखे आरोग्य शिबिर; शेकडो प्राण्यांचा सहभाग

खालापूर ः प्रतिनिधी

 खोपोली शहरातील लक्ष्मीनगर येथील खोपोली नगरपालिकेच्या महिला

व्यायामशाळेच्या प्रांगणात श्रीकृपा ऍक्वारियमने पाळीव प्राण्यांचे आरोग्य शिबिर आयोजित केले होते. व्हीपीडब्ल्यूएद्वारा निर्देशित पशुवैद्य या उपक्रमात सहभागी झाले होते. मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील या वेळी तज्ञांना हातभार लावत होते. हिमालया पेट फूड आणि हिमालया केटेल यांच्या माध्यमातून आवश्यक असलेली औषधे, खाणे आणि इतर वस्तूंची माहिती, प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन या वेळी करण्यात आले होते.

खोपोली नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा विनिता कांबळे (औटी), आरोग्य सभापती प्रमिला सुर्वे, मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या स्त्युत्य उपक्रमास सर्व मान्यवरांनी शुभेच्छा देताना आयोजकांचे कौतुक केले आणि अशा आयोजनातून समाजात पाळीव प्राण्यांची जोपासना, संवर्धन आणि जपणूक व्यवस्थित होईल, असा मनोदयही व्यक्त केला.

ज्येेष्ठ पशुवैद्य राहुल मुळेकर, डॉ. रोहित गायकवाड, डॉ. साळवी,  डॉ. शैलेंद्र रेड्डी, डॉ. रेड्डी, डॉ. बेहेरे, डॉ गुरु महाडिक यांनी सर्व प्राण्यांची तपासणी व औषधोपचार  केले.  हिमालया पेट फूडसचे सौरभ तोडकरी, हरी पांडे, अभय तिवारी, मतीउल्ला खान, विनीत उपाध्ये, सिद्धेश पवार तसेच श्री कृपा ऍक्वारियमच्या प्रवीण शेंद्रे यांच्या वतीने मोफत जुजबी औषधे आणि पेट फूड वितरित केले गेले. त्याचसोबत सुदृढ प्राण्यांना बक्षिसेदेखील दिली गेली.

झेड डॉग ट्रेनिंग आणि पुनर्वसन केंद्र नाशिकचे विक्रांत देशमुख यांनी शिबिरात दाखल झालेल्या पाळीव कुत्र्यांच्या मालकांना मार्गदर्शन करताना मोलाचे सल्ले दिले व लहानसहान  टिप्स देत आपल्या लाडक्या कुत्र्यांना कशी वागणूक द्यावी जेणेकरून ते आपल्याशी अजून जवळीक साधतील याबद्दल माहिती दिली.  या आगळ्यावेगळ्या शिबिराच्या माध्यमातून लाभार्थी प्राणीमालक आणि प्राणी समाधानी झाल्याचे चित्र दिसत होते. प्राणीमालकांसोबत अनेक नागरिकांनी आणि प्राणीप्रेमींनी या वेळी हजेरी लावली होती. या आयोजनात काही प्राण्यांची विक्री आणि देवाण-घेवाण तसेच अदलाबदलदेखील करण्यात आली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply