Breaking News

जेएनपीटीमध्ये हॉकी स्पर्धा

उरण : रामप्रहर वृत्त

राष्ट्रीय खेळ हॉकीला नवसंजीवनी प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने उरण जेएनपीटीमधील सीआयसीएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल)तर्फे आयईएस स्कूलमागील मैदानात हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी (दि. 3) जेएनपीटीचे चेअरमन संजय सेठी यांच्या हस्ते झाले.

तीन दिवस चालणार्‍या हॉकी स्पर्धेत एकूण आठ संघ आणि 150 खेळाडू सहभागी आहेत. त्यांची अ व ब अशा दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. अ गटात उत्तर, मध्य, दक्षिण व एनसीआर सेक्टर, तर ब गटात विमानतळ, दक्षिण पूर्व, डीएई/डीओएस, पश्चिम सेक्टर या संघांचा समावेश आहे. 

उद्घाटन समारंभास जेएनपीटी चेअरमन संजय सेठी यांच्यासह सीनियर कमाडंट विष्णू स्वरूप, सीएमए जे. बी. धवले, सीव्हीओ अनिल रामटेके, अमित कपूर, नितीन बोरवणकर, एम. के. शिरकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे, ओएनजीसी कमांडंट ललित झा, सहाय्यक कमांडंट ए. के. सिरोही, धर्मवीर साई, निरीक्षक बिपीन बिहारी, पंकज कुमार, सारिका बी, जैकी

अहमद आदी उपस्थित होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी (दि. 5) दुपारी 4 वाजता होणार आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply