Breaking News

निर्माल्य कलशाचे लोकार्पण

सर्वांनी स्वच्छतेचा अंगीकार करावा : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वच्छता ही सेवा आणि कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वांनी भविष्याचा विचार करून स्वच्छतेचा अंगिकार केला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. पनवेल येथील निसर्गमित्र संस्थेच्या वतीने ’गाढी नदी वाचवू या’ उपक्रमांतर्गत चिपळे येथे बसविण्यात आलेल्या निर्माल्य कलशचे लोकार्पण आमदार ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 21) करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
कचरा, निर्माल्य नदी परिसर व पात्रात न पडता लोकांना पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सौजन्याने गाढी नदीवरील चिपळे पुलाजवळ हा निर्माल्य कलश बसविण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एन. तेटगुरे, ज्येष्ठ नेते चाहुशेठ पोपेटा, सुभाष पाटील, नरेश पाटील, अशोक पोपेटा, युवा नेते शेखर शेळके, सचिन पाटील, रवींद्र नाईक, विश्वजीत पाटील, राजेश पाटील, महेश पाटील, धनंजय पाटील, निसर्गमित्र संस्थेचे संस्थापक धनंजय मदन, अध्यक्ष सचिन शिंदे, सुरेश रिसबूड, किशोर म्हात्रे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते व ‘निसर्गमित्र’ उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, निसर्गाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आजच्या उपक्रमाचा पुढच्या पिढीला निश्चित लाभ होणार आहे. त्यामुळे सर्वांनी प्रथम आपला परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. स्वच्छतेमुळे आरोग्याचे, तसेच निसर्गाचे रक्षण होते. धावपळीच्या जीवनात आयुर्मान जपण्यासाठी स्वच्छता ही ईश्वरसेवा आहे, हे मनात बिंबवले पाहिजे आणि स्वच्छतेविषयी वेळोवेळी प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply