Breaking News

घोटाळेबाज विवेक पाटलांचा तरुंगातील मुक्काम वाढला

आणखी सहा दिवसांची कोठडी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कर्नाळा बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम वाढला आहे. सत्र न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 18 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा आदेश दिला आहे.
कर्नाळा बँक घोटाळा आणि पैशांच्या अफरातफर (मनी लॉण्डरिंग)प्रकरणी विवेक पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 15 जून रोजी पनवेलमधील राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर त्यांची मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली. अनेक दिवस ते या तुरुंगात होते.
दरम्यान, पाटील यांनी प्रकृतीचे कारण पुढे केल्याने त्यांना तळोजा जेलमध्ये हलविण्यात आले. सध्या त्यांचा मुक्काम तिथेच आहे.
दरम्यान, विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 12 ऑगस्ट रोजी संपत असल्याने गुरुवारी याबाबत सुनावणी झाली. या वेळी सत्र न्यायालयाने पाटील यांची न्यायालयीन कोठडी 18 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा आदेश दिला असून आता पुढील सुनावणी त्याच दिवशी होणार आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply