Breaking News

क्षुल्लक कारणावरून दोन कुटुंबांत हाणामारी

तीन जण किरकोळ जखमी

महाड : प्रतिनिधी

महाड शहराजवळील सुंदरवाडीमधील दोन शेजार्‍यांमध्ये क्षुल्लक कारणावरून सोमवारी (दि. 23) जोराचे भांडण झाले. या वेळी हाणामारी आणि विनयभंग झाल्याने महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हर्षल अशोक तुपट आणि राजेंद्र महादेव तुपट हे दोघे सुंदरवाडी येथे शेजारी राहतात. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या दोन कुटुंबात वाद झाला. यातील आरोपी राजेंद्र तुपट यांच्या घरातील सांडपाणी फिर्यादी हर्षल तुपट यांच्या घरामागील दरवाजा लगत वाहत असल्याने हे सांडपाणी पाईपलाईनद्वारे पुढे जाऊ द्या असे सांगितल्याने रोषन तुपट याने हर्षल तुपट याच्या तोंडावर बुक्का मारला. यामुळे हर्षल याचे दात पडून दुखापत झाली. तर रोहित तुपट याने मारहाण केली. यामध्ये हर्षल तुपट (वय 30), संजीवनी अशोक तुपट (वय 50) आणि प्रियांका हर्षल तुपट (वय 28) हे तिघे जखमी झाले. यातील दोन साक्षीदारांच्या पाठीवर लाथ मारून विनयभंग केला. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व चैन तोडून नुकसान केले. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात राजेंद्र तुपट, रोशन  तुपट आणि रोहित तुपट यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हवालदार एन. एस. गायकवाड हे करीत आहेत.

Check Also

न्यू ऑरेंज सिटी को-ऑप. सोसायटीतील गैरव्यवहारप्रकरणी तातडीने चौकशीचे आदेश

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपप्रश्नाला मंत्री डॉ. पंकज भोयर यांचे उत्तर पनवेल, मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply