Breaking News

उमटे धरणाबाबत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना साकडे

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्यातील उमटे धरणात साचलेला गाळ काढून या धरणाची पाणी साठवणूक क्षमता वाढवावी, अशी मागणी भाजप ओबीसी सेल अलिबाग तालुका अध्यक्ष अशोक वारगे यांनी बुधवारी (दि. 4) केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली.केंद्रीय मंत्री कपिल पाटील बुधवारी अलिबाग तालुक्यात आले होते. त्या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्यासह ओबीसी सेल अध्यक्ष अध्यक्ष अशोक वारगे यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली व त्यांना उमटे धरणाबाबत माहिती दिली आणि निवेदान दिले. उमटे धरणातून  19 गावांना पाणी पुरवठा होतो. परंतु हे धरण आता गाळाने भरले आहे. त्यामुळे त्याची खोली कमी झाली आहे. धरणात पाणी कमी असल्यामुळे पाणीपुरवठा नियमित होत नाही. या धरणातील गाळ काढणे आवश्यक आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष जयदीश घरत, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दांडेकर, समीर राणे, रामराज पंचायत समिती विभाग भाजप अध्यक्ष अजिक्य पाटील,  मसंकुळे सरपंच सुजित गावंड, कुर्डूस सरपंच अनंत पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’

आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …

Leave a Reply