Breaking News

प्रत्येक आदिवासीवाडी-पाड्यांना वीज द्या; आमदार महेश बालदी यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन होत आहे. त्या अनुषंगाने महावितरण कंपनीच्या वतीने रायगड जिल्ह्यातील वीज वितरण प्रणालीसंबंधी सर्वसाधारण आढावा सभा खांदा कॉलनी येथे झाली. या वेळी आमदार महेश बालदी यांनी प्रत्येक आदिवासी वाडी, पाड्यांमध्ये लवकरात लवकर वीज पोहचली पाहिजे, अशी आग्रही मागणी करीत वन विभागाच्या परवानग्या तसेच इतर तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद केले.
म.रा.वि.वि.मं.कंपनी मर्यादितचे संचालक (स्वतंत्र) विश्वास पाठक आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीस संचालक अरविंद भाडीकर, मुख्य अभियंता सुनील काकडे तसेच अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.
या वेळी महावितरण कंपनीतर्फे मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना 2.0, नवीन पुनरोत्थान वितरण क्षेत्र योजना, शेतकर्‍यांना तत्काळ वीज जोडणी उपलब्ध करणे यासारखी महत्त्वाची कामे चालू आहेत. त्याचबरोबर दिवसेंदिवस वाढणार्‍या मागणीनुसार बीज प्रणालीचे क्षमतावर्धन, वीज पारेषणचे जाळे बळकटीकरण व वीज वितरणप्रणाली अधिक सुदृढ करणे इत्यादी कामे प्रगतिपथावर आहेत. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्याकरिता आढावा बैठक
पार पडली. या वेळी चालू व भविष्यातील प्रस्तावित योजना, विद्युतपुरवठा स्थितीबद्दलही आढावा घेऊन सांगोपांग चर्चा करण्यात आली.

Check Also

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 …

Leave a Reply