पनवेल : वार्ताहर
छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक तथा साप्ताहिक कोकण संध्याचे मुख्य संपादक केवल महाडिक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खांदा कॉलनी येथे राजे प्रतिष्ठानच्या नूतन कार्यालयाचा उदघाटन राजे प्रतिष्ठानचे महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई यांच्या हस्ते झाले. या वेळी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमल, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका राजश्री वावेकर, मुंबई संघटक प्रमुख चंद्रकांत धडके, मुंबई अध्यक्ष प्रकाश कोळी, मुंबई सचिव संजय गुप्ता, गिरीषदादा राणे, धारावी विधानसभा अध्यक्ष सचिन लोखंडे, मुलुंड विधानसभा अध्यक्ष रितेश गावडे, रायगड जिल्हाध्यक्ष शिवाजी कराळे, प्रकाश तुपे, दत्ता पालकर, केतन बद्रिके, महाराष्ट्र संघटिका महिला स्वाती बागडे, ठाणे जिल्हाध्यक्षा गीता वैती, पालघर जिल्हा अध्यक्षा सविता पाटील, नवी मुंबई कार्यध्यक्षा अर्चना पार्टे, स्नेहा चांदोरकर, नवी मुंबई सचिव योगेश महाजन, उपाध्यक्ष मंगेश लाड, भिवंडी अध्यक्ष मयूर पाटील, टायगर ग्रुपचे रायगड जिल्हाध्यक्ष निलेश चव्हाण, प्रकाश जाधव, मयूर भोईर यांच्यासह सामाजिक, राजकीय व शासकीय निमशासकीय विभागातील व्यक्तींनी उपस्थित राहून केवल महाडिक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.