Wednesday , February 8 2023
Breaking News

ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांना ‘एकता कला गौरव पुरस्कार’, सुनीता डागा, संपदा जोगळेकर, शुभांगी सावंत, दुर्गेश सोनार, हरेश साठे, विलास गावडे यांचाही सन्मान

मुंबई : प्रतिनिधी

अभिनयाच्या कुशल जोरावर चित्रपट-नाटय क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल एकता कल्चरल अकादमीच्या वतीने ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांना या वर्षीचा एकता कला गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अनुवादित साहित्यिक सुनीता डागा, अभिनेत्री संपदा जोगळेकर, दुष्यसंकलन शुभांगी सावंत, पत्रकारिता दुर्गेश सोनार, हरेश साठे, कवी विलास गावडे  यांचाही पुरस्कार प्राप्त नामवंतांमध्ये समावेश असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष कवी प्रकाश गणपत जाधव यांनी केली.

गेल्या 20 वर्षाहून अधिक काळापासून एकता कल्चरल अकादमी सामाजिक, शैक्षणिक, कला, सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनिय कार्य करीत आहे. या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एकता महोत्सवात गुणीजनांचा सन्मान केला जातो. त्यानुसार यंदा प्रेमा किरण यांना ”एकता कला गौरव पुरस्कार”, संपदा जोगळेकर-अभिनेत्री यांना प्रियंका प्रकाश जाधव पुरस्कृत सुनंदा गणपत जाधव स्मरणार्थ प्रिया तेंडुलकर स्मृती पुरस्कार, सुनीता डागा-अनुवादित साहित्यिक कवी प्रकाश गणपत जाधव पुरस्कृत गणपत गुणाजी जाधव स्मरणार्थ नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार, विलास गावडे-साहित्य बाळाराम कासारे पुरस्कृत वैशाली बाळाराम कासारे स्मरणार्थ दया पवार स्मृती पुरस्कार, शुभांगी सावंत – दृष्यसंकलन राजेश जाधव पुरस्कृत काशिनाथ गणपत बेनकर स्मरणार्थ शोले एडिटर माधव एस. शिंदे स्मृती पुरस्कार, दुर्गेश सोनार-पत्रकारिता सुनील खर्डीकर पुरस्कृत चंद्रभागा गणपत खर्डीकर स्मरणार्थ श्रीकांत पाटील स्मृती पुरस्कार, हरेश साठे-संदेश रामचंद्र जाधव पुरस्कृत रामीबाई रामचंद्र जाधव स्मरणार्थ नारायण पेंडणेकर स्मृती पुरस्कार, सतीश पाटील- संगीत प्रकाश पाटील पुरस्कृत सुधीर फडके स्मृती पुरस्कार, डॉ.उषा राव-शैक्षणिक रत्नाबाई भिकाजी खरटमल पुरस्कृत माणिक भिकाजी खरटमल स्मरणार्थ सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार, सुनयना गोसावी-कला उज्जय आंबेकर पुरस्कृत मधू आंबेकर स्मरणार्थ लक्ष्मीबाई कोल्हापूरकर स्मृती पुरस्कार), डॉ. माधुरी वाघचौरे -शिक्षण, शारीरिक, क्रीडा वंदना जाधव पुरस्कृत रमाबाई आंबेडकर स्मृती पुरस्कार, संकेत खर्डीकर- तरुण प्रेरक वक्ता युवा, कला, क्रीडा,शिक्षा आणि संशोधनाकरीता कल्पना चावला स्मृती पुरस्कार, आदींना पुरस्कार घोषित करण्यात आले असून समाजसेवेचे सर्वश्री पुरस्कार अनंत जाधव-नीलांबरी आंबेकर पुरस्कृत सहदेव बाबाजी लोखंडे स्मरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, किरण बढे-अहिल्याबाई रांगणेकर स्मृती पुरस्कार, संतोष धोत्रे-गंगाधर म्हात्रे पुरस्कृत यादव जनार्दन म्हात्रे स्मरणार्थ बिरसा मुंडा स्मृती पुरस्कार यांना

जाहीर करण्यात आले.   

कवी अजय कांडर, अभिनेते प्रमोद पवार, उपनिबंधक धनराज खरटमल, अभिनेत्री नीलांबरी खांबकर यांच्या निवड समितीने या पुरस्कारांची निवड केली आहे. या सांस्कृतिक महोत्सवाचे स्वागताध्यक्ष सुनील खर्डीकर असून हा महोत्सव 11 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 4.00 वाजता गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर येथे हा वितरण सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती एकताचे सचिव प्रकाश पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply