Breaking News

खारघर येथे ख्रिसमस आठवड्याचे उद्घाटन, आयोजित स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

नवी मुंबई : जिमाका

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत सहभागी होणार्‍या स्वयंसहाय्यता समूहांच्या वस्तू व उत्पादनांची जास्तीत जास्त विक्री व्हावी यासाठी खारघर येथील सेक्टर 21 च्या महालक्ष्मी सरस मार्ट येथे ख्रिसमस सणाचे औचित्य साधून बुधवारी (दि.25) ते गुरुवारी (दि. 2 जानेवारी) या कालावधीत ख्रिसमस आठवडा साजरा करण्यात येत आहे. या ख्रिसमस आठवडयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाच्या, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये स्वयं सहाय्यता समुहांनी मेथी पावडर, चहा पावडर, पुदिना, शेवगा पावडर, ग्रीन मसाला, सोया इडली मिक्स, पापड, मिरचीचे लोणचे, मोह लाडू, कोरफड तेल, हाताने बनवलेल्या बांगड्या, कॉपरपासून बनवलेल्या वस्तू,बाटिकचा कुर्ता, टी-शर्ट, उबदार घोंगड्या आणि लाकडापासून बनवलेल्या आकर्षक वस्तू विक्रीसाठी आणल्या आहेत. तसेच खाद्यप्रेमीसाठी बटाटा वडा, थालीपीठ, चिकन, मासे आणि शाकाहारी असे चटपटीत  भोजन सुध्दा उपलब्ध आहे.

या ख्रिसमस आठवड्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध आहे. यामध्ये शुक्रवारी (दि.27) मेहंदी स्पर्धा तर शनिवारी (दि.28) ड्रिम कॅचर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी नवी मुंबईकरांनी ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये द महालक्ष्मी सरस मार्ट येथे भेट देऊन स्वादिष्ट शाकाहारी जेवण, चवदार मासे आणि चिकनचा आस्वाद घ्यावा व भरपूर शॉपिंग करावी आणि स्वयं सहाय्यता समुहांच्या वस्तू व उत्पादने खरेदी करून त्यांना प्रोत्साहीत करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान आर. विमला यांनी केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply